Breaking

जुन्नर'च्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रामध्ये राज्यात प्रथम.

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ऋतुजा लांडे या विद्यार्थिनी ने १२ विच्या परीक्षेत भरघोस यश मिळवत राज्यशास्त्र या विषयामध्ये ९७ मार्क्स मिळवले आहेत तर आदिवासी विकास विभाग मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. सर्व स्तरांमधून तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. 

    जुन्नर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असणारे आदिवासी वस्तीचे घाटघर हे ऋतुजाचे गाव. आई संजाबाई व वडील संपत लांडे हे शेती करतात जेमतेम असणारी शेती हेच उत्पन्नाचे साधन आई वडिलांचे शिक्षण फारसे झाले नाही. पण आपल्या मुलीने शिकून मोठं व्हावं हि आईची इच्छा. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे तिने चीज केल्याची भावना तिच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.

     ऋतुजाने घाटघर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर जुन्नर जवळील आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश घेतला. आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे, वर्ग शिक्षक एस. एस. भारती यांचे देखील तिला चांगले मार्गदर्शन व सहकार्य लाभले राज्य शास्त्र विषयाचे प्राध्यापक गणेश गोडसे यांचा देखील तिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे मत तिने "महाराष्ट्र जनभूमी" शी बोलताना व्यक्त केले. 
  
    ऋतुजाला कायद्याची आवड असून तिला विधितज्ञ्  व्हायचे आहे. महिलांमध्ये असणारे कायद्याविषयी अज्ञान याबद्दल देखील तिला जनजागृती करायची आहे.

  ऋतुजाच्या यशामध्ये प्रकल्प अधिकारी जितेंद्र डू. डी., सहायक शिक्षण प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, अधीक्षिका ए. के. राजपूत, बी. डी. आमटे, व्ही. डी. साबळे, पूर्व अधिक्षिका ए. टी. पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

1 टिप्पणी: