Breaking

मोठी बातमी: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार


नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने अवघा देश ढवळून निघाला आहे. आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहे, आता अशातच या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा