Breaking

रुग्ण हक्क परिषदेच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरूख मुलाणी यांची नियुक्ती.

मुंबई : रुग्ण हक्क परिषदेच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरूख मुलाणी यांची निवड परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी ई-मेल द्वारे नियुक्ती पत्र देत केली आहे.

रुग्णांच्या हक्कांची चळवळ उभी करणारी आंदोलक संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद अल्पावधीतच नावारूपाला आली आहे, सामाजिक विषयांवरील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद सातत्याने कार्यरत आहे. शासनदरबारी अनेक प्रलंबित असलेले विषय मंत्रालयीन कामकाजात पाठपुरावा करण्याचे काम अनेक दिवसांपासून करत असणारे रुग्ण हक्क परिषदेचे मुंबईस्थित शाहरुख मुलाणी यांची मंत्रालयीन सचिव पदी निवड रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली. 

मूळचे जि. सोलापूर येथील शाहरुख मुलाणी यांना मंत्रालय - विधिमंडळ कामकाजाचा गेली ०९ वर्षे प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच मंत्रालयातील अभ्यासू शाहरुख मुलाणी यांची मंत्रालयीन सचिव पदी महाराष्ट्र प्रदेश कमिटीत नियुक्ती केली आहे. डॉक्टर संरक्षण आणि रुग्णांच्या, न्याय, हक्क, अधिकारांसाठी लढणारी एकमेव संघटना आहे, असे मुलाणी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा