Breaking

१९ ऑगस्ट : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या टॉप ९ बातम्या वाचा एका क्लिक वर.

१. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय राखीव.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सुनावणीदरम्यान विचारले की, यूजीसीच्या निर्णयाच्या विरोधात कोणतेही राज्य निर्णय घेऊ शकते का ? आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय योग्य आहे, हे विद्यार्थी स्वत: ठरवू शकत नाहीत. निर्णय विद्यार्थ्यांऐवजी वैधानिक संस्था घेतील.  कोर्टाने या प्रकरणासंबंधी सर्व पक्षकाराकडून तीन दिवसांत अंतिम लेखी निवेदन मागितली आहे. न्यायमूर्ती भूषण यांनी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्येबाबत आणि सर्व विद्यार्थ्यांजवळ लॅपटॉप ची सोय नसल्याची ही दखल घेण्याबाबत बोलले आहेत.

२. जेईई आणि एनईईटी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

कोरोना महामारीमुळे अभियांत्रिकी जेईई आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा एनईईटीसाठी प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.  सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना फटकारले आणि विचारले की कोरोनामुळे देशभर सर्व काही थांबवता येते का?  आपण विद्यार्थ्यांचे एक मौल्यवान वर्ष वाया जाऊ देऊ शकत नाही. कोरोना काळातही आयुष्य पुढे नेले पाहिजे.

आता जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने आणि एनईईटी १३ सप्टेंबर रोजी १६१ केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. ११ राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे जेईई आणि एनईईटीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

३. सध्या शाळा उघडणे शक्य नाही : शिक्षणमंत्री गायकवाड

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे शक्य नाही. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये, म्हणूनच ई-संवाद प्रभावीपणे शिकवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री वहिनी, आकाशवाणी, यूट्यूब सारख्या माध्यमांचा वापर केला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे साधनसामग्री नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी मित्र, शिक्षक मित्र यांच्या माध्यमातून विशेष शिक्षण दिले जाते. काही जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी अध्यापनासाठी पुढे येत आहेत.

४. पॉलिटेक्निकमधील दुसर्‍या शिफ्टसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना अभियंता बनण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्रातील १५ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये वर्ग सुरू करण्यात आले आहेत.  राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की १ हजार ९२० जागा द्वितीय शिफ्ट वर्गात उपलब्ध आहेत. सध्या कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.  नंतर वर्ग सुरू केले जातील.  शैक्षणिक २०२०-२१ साठी आवश्यक माहिती http://www.dtemahara.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. मंत्री मलिक म्हणाले, अल्पसंख्याक समाजांतर्गत मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, पारशी समाजातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

५. विद्यापीठ विभागांना ई-लर्निंगमध्ये रस नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सोमवारी १७ ऑगस्ट रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू केले. त्याअंतर्गत विभाग आणि महाविद्यालये ऑनलाईन वर्गातून अभ्यास करणार होती.  विद्यापीठाच्या परिसरातील बहुतांश विभागांनी ऑनलाईन वर्गात विशेष रस दाखविला नाही. बहुतांश कॉलेजेसमध्ये ही तशीच स्थिती आहे. एलआयटी सारख्या निवडक संस्थांना सोडले तर ही स्थिती बहुतांश ठिकाणी दिसली. यावर विभाग आणि महाविद्यालये असे म्हणतात की शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.

६. ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत शाळांना दिलासा.

नर्सरी ते दुसरीपर्यंत च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी पालक परेन्ट्स टीचर असोसिएशन तर्फ आव्हान देणात येणार आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने नर्सरीपासून दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये हा आदेश आणखी तीन आठवडे कायम राहील अस उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

७. संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह 8 तारखेला.

नागपूर जिल्ह्यात रामटेकमधील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा दीक्षांत समारंभ ८ सप्टेंबर रोजी होईल.  ऑनलाइन पद्धतीने हा प्रोग्राम होणार आहे.  या समारंभात शैक्षणिक सत्र २०१८ - २०१९ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासन लवकरच या सोहळ्याची सविस्तर रूपरेषा जाहीर करणार आहे.

८. सीईटी परीक्षेबाबत अजूनही प्रतिक्षाच.

यावर्षी एमएचसीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार होती. जी लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली होती. अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, बिझिनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेल दरवर्षी ही परीक्षा घेतो. राज्यातील सुमारे ४ लाख विद्यार्थी यात सहभाग होतात. 

९. तंत्रनिकेतन ऍडमिशन साठी प्रवेश सुरू. 

राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा वतीने १० ऑगस्ट पासून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली व विद्यार्थ्यांना २५ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे. 

मात्र ८ दिवसात राज्यात केवळ ५८७८ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी अर्ज केला आहे. संपुर्ण राज्यात तंत्रनिकेतन च्या १ लाख १७,८२४ जागा आहेत. प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रे डाउनलोड करावी लागणार आहे. त्यानंतर ई माध्यमातून कागतपत्रे तपासणी होणार आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांना विशिष्ट वेळेत बोलावून कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. क्रेडिट व डेबिट कार्ड च्या माध्यमातून प्रवेश शुल्क ही भरता येणार आहे. कागदपत्रे तपासणी १५ ते २५ ऑगस्ट पर्यंत असणार त्यानंतर २८ ऑगस्ट ला तात्पुरता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. २९ ते ३१ ऑगस्ट पर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. २ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अमित हटवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा