Breaking

बचतगट, फायनान्स व बँकांची कर्जवसुली थांबवा; पुरोगामी युवक संघटनेची मागणी.सांगोला : बचतगट , फायनान्स व बँकांची कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव शहराबरोबर ग्रामीण भागामध्येही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण आहे. जरी लॉकडाउनमध्ये शिथीलता दिली असली तरी लोकांना अजूनही कामधंदा उपलब्ध झालेला नाही व्यावसायीकांची सुध्दा हिच आवस्था आहे. व्यवसायावर फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे.

राज्य सरकारने ह्याचा विचार करून बचतगट, फायनान्स व बँकाची कर्ज वसुली ऑगस्ट अखेर थांबवण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला होता, परंतू अजूनही लोकांना कामधंदा नाही. आहे त्यातून घर चालवणे मुश्किल आहे. व्यवसायामध्ये जम बसण्यास आणखी कालावधी जाणार आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली म्हणजे नागरीक लगेचच आर्थिक बाजूने सक्षम झाले असे नाही, अजूनही लोकांना जगण्यासाठी व किरकोळ दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी आक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आशात जर ह्यांना कर्जवसुलीचा तगादा लावल्यास हे योग्य होणार नाही. तरी आपण सारासार विचार करून अशा कर्जाच्या हप्त्यांची वसुली आणखी सहा महिने थांबवावी व लोकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत झालेनंतर सदर हप्ते भरू घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री दिपक  गोडसे, कार्याध्यक्ष ॲड. विशालदिप बाबर, चिटणीस शिवाजी सरगर, ॲड. धनंजय मेटकरी, शे. का. पक्षाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री चंद्रकांत सरतापे, पुरोगामीचे इतर पदाधिकारी नितीन दिघे, चंद्रकांत देवकते, बिरुदेव शिंगाडे, अक्षय बोत्रे, सचिन गोतसुर्य, श्री तांबोळी व इतर तालुका पुरोगामी युवक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा