Breaking

गोव्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी. वाचा सविस्तर.

गोवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ घेतली. डोना पॉला, पणजी येथील राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती  दीपांकर दत्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी आपली शपथ कोंकणी भाषेतून घेतली. 
 
शपथविधी सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा