Breaking

पालघर तालुक्यात कोरोनाबद्दलच्या शासकीय बेपर्वाईविरुद्ध माकपचा रस्ता रोको.

पालघर : पालघर तालुक्यात कोरोनाबद्दलच्या शासकीय बेपर्वाईविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुंबई-अहमदाबाद हायवेवर तारापूर एमआयडीसी मध्ये जाणाऱ्या पालघर तालुक्याच्या चिल्हार फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला.

कोविड-१९ मुळे बोईसर तसेच लगतच्या पंचक्रोशीत कोरोना पेशंट मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये सापडत असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना तसेच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे स्थानिक नागरिक, कामगार, शेतकरी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे यांना माकपच्या निवेदन देऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी निवेदनातील मागण्यांवर आठ दिवसांत योग्य कारवाई करण्याचे त्यांनी मान्य केले. 

या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य व जिल्हा सचिव बारक्या मांगात, राज्य कमिटी सदस्य व डहाणूचे आमदार विनोद निकोले, राज्य कमिटी सदस्य किरण गहला, जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत घोरखाना, पालघर तालुका माजी सचिव मधुकर डोवला, हर्षल लोखंडे, निलेश विचारे, मगन दाभाडे, भगवान लहांगे, सुभाष भुयाळ, सचिन सावरा, सतिश पाटील, जॉन, मोहन पिल्ले, विकास सिंग, दिनेश चव्हाण, हिरालाल भारद्वाज, शिवकुमार शर्मा, संजय सिंग, यशवंत ठाकरे, मुबारक, इम्रान, झाजा, ब्रिजेश यादव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा