Breaking

ख्रिश्चन दफनभूमीसाठी माकप रस्त्यावर उतरणार - कॉ. गंगाधर गायकवाड.

नांदेड : जिल्ह्यातील एकमेव ख्रिश्चन दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. १ सप्टेंबर रोजी माकप जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करणार असून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळविले असल्याचे माकपचे कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.

ख्रिश्चन समुदायाचे सॅम्युअल नागूरे व कॉम्रेड रविंद्र काशिनाथ जाधव यांनी पुढाकार घेऊन खडकपुरा, समिरा बाग पहाणी करुन दफनभूमीचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली असल्याचे माकप ने म्हटले आहे. 

एकमेव दफन भूमित असुविधा दिसून आल्या आहे, येथे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपे, बंद लाईट, खराब झालेले अंतर्गत रस्ते, समाध्यांवर वाढलेली झुडपे, पिण्याचे पाणी नाही. कर्मचाऱ्यांस तुटपुंजे मानधन आदी मागण्या त्वरित सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माकपचे गंगाधर गायकवाड म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा