Breaking

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण


नागपूर  : देशात कोरोना विषाणू येऊन आता जवळ जवळ सहा महिने होत आहेत. अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. सर्व सामान्यांपासून नेते, अभिनेते, अधिकारी अशा सर्वच क्षेत्रातील लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताना दिसत आहे. अशातच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना हि कोरोनाची लागण झाली आहे. 


आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः मुंढे यांनी ट्विटर वरून दिली आहे. मुंढे यांनी ट्विट करून म्हंटले आहे की मी प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वत: ला आयसोलेशन केले आहे. गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील मुंढे यांनी केले आहे. मी नागपुरातील साथीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरून कार्य करीत आहे असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा