Breaking

आदर मावळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ तास सुरू ठेवा तसेच रस्तावरील झाडे झुडपे कापा बिरसा क्रांती दलाची मागणी

वडेश्वर : मावळ तालुक्यातील आदर मावळ भागातील वडेश्वर ते खांडी व भोयरे ते सावळा या रस्तावरील असलेल्या झाडाच्या फादया, रस्तावरील झुडपे तोडून वाहतूकीस होणारा अडथळा दुर करण्याची मागणी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळ यांच्याकडे केली.

या मार्गावर आदर मावळात जाण्यासाठी २५ गावाचा संपर्क येत असतो. तसेच आदिवासी भागात दळणवळण वाढले असून अपघात होण्याची शक्यता आहे, तरी तात्काळ संबधीत विभागाने ही रस्तावरील आलेली झाडे, झुंडपे तोडण्यात यावी. झुंडपे, झाडामुळे नागरीकांना यामार्ग प्रवास करताना त्रास होत आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आहे. जर अपघात झाला तर जबाबदार कोण असणार आहे, असा देखील प्रश्न बिरसा क्रांती दलाने उपस्थित केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र खाडी, नागाथळी, गोवीत्री, करंजगाव, किवळे या ठिकाणी आरोग्य सेवा सुरळीत होण्याबाबत गटविकास आधिकारी मावळ यांना निवेदन देण्यात आले. 

कळंकराई येथील दुर्गम भागातून टाकवे व कान्हे या ठिकाणी ४० किमी अंतरावर यावे लागते. तरी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र खाडी व नागाथली हे केंद्र सुरळीत २४ तास चालू ठेवावे. आदिवासी भागात पावसाळ्यात आजाराचे प्रमाण वाढत असते, पावसामुळे पाण्यातुन रोगराई वाढू शकते. जुलाब, खोकला, ताप असे आजार होणारा नागरिकांना आरोग्य सेवा सुरळीत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या कडे गाभिंयाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर, पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, महासचिव उमाकांत मदगे, खाडीचे उपसरपंच बाळू पावशे, वडेश्वरचे ग्रा प सदस्य सुरेश गवारी, बजरंग लोहकरे, अनिल कोकाटे, रामदास गवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा