Breaking

कोरोना साथ रोग नियंत्रणाच्या कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी.

सोनपेठ :  महराष्ट्रातील शिक्षकांना साथरोग नियंत्रणाच्या कामकाजातून कार्यमुक्त करण्यात यावे, अशा प्रकारचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले असल्यामुळे व शालेय कामकाजात वेगवेगळ्या प्रकारचे कामे असल्यामुळे, अधिग्रहीत केलेल्या आस्थापनातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी शिक्षकांकडून गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोरोना साथरोग नियंत्रणात विविध प्रकारच्या उपाययोजनांमध्ये शिक्षकांना नाकाबंदी, सर्वेक्षण, निवारागृह व शहर नियंत्रण पथक अशा विविध ठिकाणी शिक्षकांना कामे करावी लागत असून या कोरोना नियंत्रणाच्या कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासनाचा निर्णय असून याप्रमाणे शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्याकडे सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा.महालिंग म्हेत्रे, मुख्याध्यापक संघाचे राजकुमार धबडे, शिक्षक दत्ता केशव पवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा