Breaking

DYFI सह जनवादी महिला संघटनांची प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची मागणी.

पिंपरी चिंचवड : प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची मागणी जनवादी महिला संघटना व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा केंद्राची कमतरता आहे, वैयक्तिक लॅपटॉप सामान्य लोकांकडे नाहीत, मोबाईलवर अर्ज भरणे तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे होत आहे, अनेकांकडे ई-मेल नाहीत, कुटुंब सदस्याची आधार कार्ड नाहीत, शहरातील नागरीसुविधा केंद्रावर आधीच विद्यार्थी आणि अन्य नागरिकांच्या दाखल्यासाठी प्रचंड गर्दी आहे. ज्या गरीब लोकांसाठी हि योजना आहे ते संगणक साक्षर नाहीत.अनेक संभाव्य लाभार्थी लॉकडाउन मुळे बाहेरगावी आहेत. आहेत ते बारा तास काम करत आहेत.

त्यामुळे अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ ३० ऑक्टोबर २०२०पर्यंत द्यावी, ई-मेल ऑप्शनल ठेवावा, सक्ती नसावी, नाममात्र १००० रुपये नोंदणी डीडी घ्यावा, उपलब्ध कागदपत्रे स्वीकारून अन्य आवश्यक कागपत्रासाठी एक महिन्याची मुदत वाढ   अत्यावश्यक सर्व दाखले सोडतीच्या वेळी घ्यावेत, घरे बांधण्याचा खर्च ताबा घेण्यापूर्वी वसूल करू नये. घराचा ताबा द्यायच्या आधी सरकारने बँक हमी घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करून द्यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच आम्हाला कर्ज कोण देणार? याचे स्पष्टीकरण आयुक्तानी द्यावे, असे ही या संघटनांनी म्हटले आहे. निवेदनावर अपर्णा दराडे, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, अमिन शेख, संतोष गायकवाड, सोनाली शिंदे, मंगल डोळस, शेहनाज शेख, वैशाली थोरात, ज्योती मूलमूले, सतीश मालुसरे, अविनाश लाटकर, किसन शेवते, सतीश मालुसरे, विनोद चव्हाण यांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा