Breaking

जलपरिषद मित्र परिवारातर्फे विधानसभा उपाध्यक्षांकडे विविध मागण्यांना घेऊन निवेदनाद्वारे मागणी.

नाशिक : जलपरिषद मित्र परिवारातर्फे विधानसभा उपाध्यक्षांकडे विविध मागण्यांना घेऊन निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

आदिवासी हितासाठी व अभिमानास्पद एक वास्तू शिल्प दिंडोरी येथे उभारावे, ओझरखेड धरण परिसरात भगवान बिरसा मुंडा पार्क साकारण्यात यावे या मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले.                                                                                        
नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड येथील धरण परिसरात आद्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व पार्क साकारावे. आदिवासी खाद्य पदार्थ विक्री केंद्र, बांबूच्या वस्तू विक्री केंद्र, आदिवासी कलाक्रुती प्रदर्शन, अभ्यासिका व ध्यानधारणा केंद्र, आदिवासी सांस्कृतिक हाँल, पर्यटक निवास व्यवस्था, धरण क्षेत्रातील मध्यवर्ती टेकडीवर भगवान बिरसा मुंडाची १०१ फुटी भव्य स्मारक, स्मारकापर्यत झुलता पुल व धरण काठालगत जाँगिंग ट्रँक, बोटींग व संपूर्ण परिसर फेरीसाठी मिनी रेल्वे अशा वैशिष्ट्यपूर्ण बाबी समाविष्ट असलेला प्रोजेक्ट असून यासाठी आपण आपल्या परिने पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी शासकीय स्तरावर मंजुरी मिळणेकामी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी जनार्दन खोटरे, दुर्वादास गायकवाड, संजय गवळी, गीतेश्वर खोटरे, राकेश दळवी, देविदास कामडी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा