Breaking

ध्येयवेड्या सरोजचा वाढदिवस मित्रांनी केला वृक्षरोपणाने साजरा. वाचा सविस्तर

कोल्हापूर : काही माणसांचे विचार, त्यांचा ध्यास हे कायमस्वरूपी आठवणीत राहतात. ध्येयवेडा सरोज तानाजी पोवार याचेही विचार असेच. त्याचा मित्रांनी त्याचा वाढदिवस वृक्षरोपण करुन साजरा केला.

कोणाच्याही अडचणीच्या वेळेला धावून जाणे, पूरग्रस्तांना मदत करणे, अनाथाश्रमातील मुलांना भेट देणे, त्यांना मायेने जेवू घालणे तसेच पर्यावरण रक्षणासाठी सतत जागरूकता करत राहणे ही त्याची कार्ये म्हणजे त्याच्या विचारांची प्रचितीच. त्याचे अपघाती निधन कुटुंबाला आणि मित्र परिवाराला चटका लावणारे होते. 

त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे हे विचार असेच जोपासण्यासाठी त्याच्या मित्रांनी वृक्षरोपणाचा उपक्रम पार पाडला. वृषभ पाटील, पुष्पक माणकापूरे, सुहांत मगदूम, जिनेन्द्र समजन्नावर, सम्मेद पाटील, विनायक सुतार या मित्रांनी निमशिरगाव येथील डोंगरावर त्यांनी १५ रोपे लावली आणि ध्येयवेड्या सरोजला त्याच्या वाढदिवशी आदरांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा