Breaking

माणुसकीची साथ समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.


पुर्णा : माणुसकीची साथ समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 

माणुसकीची साथ समूहाच्या माध्यमातून धान्य वाटपासाठी जमा झालेल्या अतिरिक्त पैशातून जे शालेय साहित्य खरेदी केले होते. त्यातून आज जिल्हा परिषद शाळा मस्तानपुरा पूर्णा येथे ३०० वह्या व प्रत्येकी ६० पेनचे वाटप करण्यात आले. 

यावेळी माणूसकीची साथ समूहातील अनिल मगरे, नसीर शेख, भीमा वावळे आणि संदीप साबने व शाळेतील मुख्याध्यापिका रेखा जोंधळे / श्रींगारपुतळे व शिक्षिका साने आदी सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा