Breaking

डॉ. गोविंद गारे यांच्या स्मृती व्याख्यानमाला; स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानांचे आयोजन.

पुणे : डॉ. गोविंद गारे यांच्या स्मृती निमित्ताने आदिवासी विचार मंच आणि बिरसा क्रांती दलाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांंचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
    
शनिवार दिनांक २२ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प गुंफले जाणार आहे. यावेळी आयपीएस डॉ.सुधीर जाखेर, तसेच सहाय्यक आयुक्त जीएसटी चे मुरलीधर बांडे मार्गदर्शन करणार आहेत.

तरी ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यानी या व्याख्यानमालेचा नक्की लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  सहभागी होण्यासाठी खालील व्हाट्सएप क्रमांकावर नाव, गाव, मोबाईल क्रमांक अशी माहिती पाठविणे गरजेची आहे. व्हाट्सएप नंबर 9404613755, 9869128367, 9975886982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा