Breaking

गणेशोत्सव व कोरोना साथरोग काळात सर्वांनी नियमांचे पालन करावे, जिल्हा पोलीस उपअधिक्षक लांजले यांचे आवाहन

सोनपेठ : येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.१९ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते २ दरम्यान गणेश मंडळांचे पदाधिकारी इतर कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डीवायएसपी लांजिले हे उपस्थित होते तर आयोजक पोलिस निरिक्षक गजानन भातलवंडे हे होते.

यावर्षी कोरना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान विविध प्रकारच्या कायदेशीर बाबींचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे, कोणताही उपक्रम करताना पूर्ण विचार करून साथरोग पसरणार नाही, याची खबरदारी सर्वांना घ्यावी लागेल. ही खबरदारी घेत असताना प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक असल्याचे मत जिल्हा पोलिस उपाधीक्षक लांजिले यांनी व्यक्त केले. ते गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी सर्व कायदे आणि सद्य परिस्थिती याबाबत जिल्हा पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत त्यांनी कोरोना काळात श्री गणेश मूर्ती स्थापने बाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची, नियमांची माहिती देऊन त्याचे पालन करण्याविषयी सांगितले. 

यावेळी  कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन  सपोनि  प्रवीण सोमवंशी यांनी केले, यावेळी  सोनपेठ शहर व हद्दीतील  गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्ती विक्रेते व इतर सर्व संबंधित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा