Breaking

कोरोनाच्या महामारीतही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची लूट सुरूच


पुणे  : राज्यात कोरोनाच्या महामारीने धुमाकुळ घातला आहे. शाळा महाविद्यालये कधी सुरु होणार या कडे जनतेचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार अथवा केंद्र सरकारने शाळा, कॉलेज सुरु करण्या संदर्भात अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही मात्र राज्यभरात अनेक कॉलेजने आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरु केली आहे. 

राज्यात 1 सप्टेंबर पासून शाळा, महाविद्यालय सुरु होणार अशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे, मात्र देशात महाराष्ट्रात आणि जगात भारतात विक्रमी संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाने लोकांची आवक जावंक बंद असल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अगोदरच देशात आर्थिक मंदीची परिस्थिती असताना कोरोनाने अनेकांना बेरोजगार केले परिणामी अनेकांना काय खावे असा प्रश्न निर्माण झाला असताना आता शैक्षणिक संस्थांनी ऍडमिशन प्रक्रिया सुरू केली आहे.  इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या सोयी उपलब्ध नसल्याने अगोदरच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहातून दूर लोटले जात असताना आता  महाविद्यालयांच्या अवाढव्य फी अभावी मोठया प्रमाणात विदयार्थी शिक्षणाच्या बाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

महाविद्यालये सुरु झाली नसताना देखील विद्यार्थ्यांकडून सर्वच फी घेतली जात आहे. यात कोणत्याही प्रकारची फी कमी केलेली दिसत नाही. तसेच अनेक ग्रामीण भागात नेटवर्कची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजचे ऍडमिशन सुरु झाले आहेत किंवा नाही हे माहित नाही, अशा परिस्थितीत काही महाविद्यालयांनी काही शाखेच्या मीरीट मिस्ट लावुन कॉलेजचे ऍडमिशन पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा