Breaking

आकुर्डीत ध्वजारोहण, परीचारिका आरोग्य सेविकांना मानवंदनाआकुर्डी : आकुर्डी येथे मनपा दवाखाना येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायफआय, जनवादी महिला संघटना यांच्यावतीने आरोग्यसेवक सदानंद साबळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी लता रविंद्र जगताप, शैलेश तवर, अंजली जाधव, सोनुताई गरिबे, तसेच इतर परिचारिका आणि आरोग्य सेवक उपस्थित होते.

आकुर्डी मनपा दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यानी मानवंदना दिली, तसेच दिवंगत कोव्हिड योद्धे, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

देविदास जाधव, विनोद चव्हाण, सुभाष काल कुंद्रिकर, मंथना एडके, सोनाली शिंदे, अपर्णा दराडे, गणेश दराडे, सचिन देसाई, अर्चना इंगोले यावेळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा