Breaking

जुन्नर तालुक्यातून सर्वप्रथम विविध विषयांवर समाज उपयोगी वेबिनार्सचे आयोजन.

जुन्नर (आनंद कांबळे) : शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बांगरवाडी बेल्हे, जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर वेगवेगळ्या व्याख्यात्यांची राज्यस्तरीय वेबसेमिनार्स आयोजित करून शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम चालू ठेवला असून ह्यात ९ मार्गदर्शक व्याख्यात्यांची ७ वेबसेमिनार्स संपन्न झाली असून जुन्नर तालुक्यातून सर्वप्रथम अशा समाज उपयोगी वेबिनार्सचे आयोजन केले असल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली.

सदर वेबिणार मध्ये एन. सी.आर. ए. पुणे चे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर जे. के. सोळंकी यांनी करिअर घडविताना, तर मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग माजी अध्यक्ष विनय र.र. यांनी घरोघरी प्रयोग शाळा, लेखक प्रा. रविवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती, तर युवा शास्रज्ञ अंकिता नगरकर यांनी वैज्ञानिक शोध व पेटंट, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. संजय कुमार रहांगडाले यांनी वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व, तर इतिहास संशोधक डॉ.लहू गायकवाड यांनी इतिहास गणिताचा, तर माजी प्राचार्य म.ल. नानकर यांनी चला दोस्ती करूया गणिताशी, तर कल्याण कडेकर यांनी शिष्यवृत्तीचा गुरुमंत्र, तर प्रा. हेमंत महाजन यांनी जीवनात इंग्रजीचे महत्व आदी विषयांवर वक्त्यांनी विद्यार्थी पालक, शिक्षक यांना मार्गदर्शन करून शंकांचे समाधान केले असल्याची माहिती समर्थ रुरलएज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे विश्वस्त वल्लभ शेळके दिली.

सदर राज्यस्तरीय वेबिनार मध्ये विविध जिल्यातील, तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला असून त्याचा फायदा हजारो विद्यार्थी, पालक व शिक्षकांना झाला आहे. हे विबिनार्स यशस्वी करण्यासाठी राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल, गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे,  विज्ञान संघाचे सचिव तानाजी वामन, विज्ञान संघाचे उपाध्यक्ष यशवंत दाते,सहसचिव दिलीप लोंढे, विरेंद्र काळे, आकाश भोर, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बांगरवाडी बेल्हेचे प्रदीप गाडेकर, भूषण बो-हाडे यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा