Breaking

आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या चार बातम्या


1. केंद्रीय भरतीसाठी राष्ट्रीय संस्था

      केंद्र सरकारने बिगर राजपत्रित कर्मचारी, रेल्वे आणि सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा भरतीसाठी 'राष्ट्रीय भरती संस्था'  स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ही संस्था भरती प्रक्रियाच्या पहिल्या फेरीत सामायिक पात्रता परीक्षा (CET) घेईल. ही परीक्षा 12 भाषामधून घेतली जाईल, ती ऑनलाईन असेल. गुणवत्ता यादी तीन वर्षांसाठी ग्राह्य धरली जाईल. उमेदवाराला गुण सुधारविण्यासाठी पुन्हा परीक्षा देत येईल. पात्रता परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या फेरीत त्या त्या विभागासाठी परीक्षा द्यावी लागेल. त्यातून उमेदवारांची भरती साठी अंतिम निवड होईल. प्रत्येक जिल्हयात एक परीक्षा केंद्र असेल.

2. परीक्षेसाठी जिल्हा केंद्र निवडण्यास मुभा

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फ 11 ऑक्टोबर ला होणाऱ्या दुय्यम सेवा पूर्वपरीक्षासाठी उमेदवाराणा जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना 21 ते 26 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र ऑनलाईन पध्दतीने निवडता येणार आहे. तसेच आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षा 20 सप्टेंबर ला घेतली जाणार आहे. या परीक्षा साठी पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना केंद्र बदलण्याची परवानगी आयोगाकडून देण्यात आली आहे.

3. 31 ऑगस्ट पर्यंत नागपूर विद्यापीठात बाहेरील व्यक्तीला  बंदी

         वाढत्या कोरोना रुग्णामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी विद्यापीठात कार्यालय कर्मचारी शिवाय इतरांच्या प्रवेशास बंदी घातली आहे. या संबंधीचे पत्र विद्यापीठाने जाहीर केले आहे. पण काही सदस्यांकडून याचा विरोधही होत आहे.

4. अभियांत्रिकी प्रथम वर्षांची सुरुवात 1 नोव्हेंबर पासून

        एआयसिटीईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनिअरिंग सोबतच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या रेग्युलर विद्यार्थ्यांचे वर्ग 1 सप्टेंबर पासून तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षात बदल होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा