Breaking

वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त शहीद नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन.

सोनपेठ : येथील विवेक वाहिनी  प्राणीशास्त्र विभाग कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ येथे नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बालासाहेब काळे,प्रमुख पाहुणे भास्कर कदम तर मार्गदर्शक म्हणून आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे होते.

शहरातील कै .रमेश वरपुडकर महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन दरवर्षी वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून विवेक वाहिनी व प्राणिशास्त्र विभाग यांच्या वतीने साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे जनजागरण व वैज्ञानिक दृष्टिकोन यासंदर्भात माहिती देणारे व्हिडिओ विभागाच्यावतीने घेण्यात येणार आहेत, तरी आज पासून हा सप्ताह सुरू होत आहे. या उपक्रमांची सुरुवात डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करून करण्यात आली आहे.

याप्रसंगी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ.मुकुंदराज पाटील, मराठी विभाग प्रमुख बालासाहेब काळे, प्रा. डॉ. शिवाजी वडचकर, भास्कर कदम, प्रा. महालिंग मेहेत्रे, रंगनाथ चोंडे, बाबुराव फड, पंजाब सुरवसे, दत्ता सोनटक्के यांची उपस्थिती होती शारीरिक आंतर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख संतोष रणखांब यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा