Breaking

रुग्ण सेवेचा दर्जा सुधारा; आरोग्य विभागाच्या विरोधात माकपची आकुर्डी येथे भर पावसात निदर्शने.

पिंपरी चिंचवड : रुग्ण सेवेचा दर्जा सुधारणेच्या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने खंडोबा मंदीर चौक आकुर्डी येथे वतीने भर पावसात पावसात निदर्शने केली.

यावेळी बीपीएमसी एक्ट १९४९ नुसार   प्रत्येक महापालिकेने स्वतःचे संसंर्गजन्य रूग्णालय उभारुन शहरातील नागरिकांना संसंर्गजन्य रोगांवर उपचार करा, कोट्यावधी रूपये  खर्च करून तात्पुरते जंबो रूग्णालय न उभारता कायम स्वरूपी संसंर्गजन्य रूग्णालय उभारण्यात यावे, किंवा नविन जिजामाता रूग्णालय वा नविन भोसरी रुग्णालय कायमस्वरूपी संसंर्गजन्य रूग्णालय करावे, वायसीएम हाॅस्पिटल मधील पहिल्या मजल्यावरील रूबी एल केयर  खाजगी हाॅस्पिटलचे करार करून कोवीड रुग्णांसाठी २० बेड अधिग्रहित करून तिन महिने होत आहेत. दरमहा ५० लाख रूपये महापालिका खर्च करिता आहे. ह्या कराराची व ह्या हाॅस्पिटलची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करावी. 

तीन महीने होऊनही महापालिकेच्या डॅशबोर्ड वर ह्या भागिदारीतील खाजगी हाॅस्पिटलची आकडेवारी उपलब्ध नाही. ही माहिती लपवून ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. ह्याविषयी तातडीने कारवाई करावी, प्रत्येक महापालिका दवाखान्यात कोवीड स्क्रिनींग साठी रॅपिड अँँटीजन टेस्ट दररोज उपलब्ध करून द्यावे, नविन जिजामाता रूग्णालयात कोवीड रुग्णांना अत्यंत निकृष्ट आहार दिला जातो त्याचा प्रत्यक्ष पुरावा व्हिडिओ ही सादर केला. परंतु आयुक्तांनी अजुनही ठेकेदाराचा ठेका रद्द केला नाही. हे नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. तरी ह्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा व इतर कोवीड सेंटरमध्ये ही आहाराबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून देखरेख करावी,
प्रत्येक वार्डात अँटिजेंन आणि आरटी पीसीआर टेस्ट साठी स्वतंत्र सेंटर स्थापित करा सध्या नागरिकांच्या तपासणीसाठी रांगा वाढत आहेत, कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची  गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र नियंत्रक ठेवा, जेवण नाश्ता ठेकेदारांच्या संस्थांची नावे स्मार्ट सारथीवर जाहीर करा, रुग्ण सेवेसाठी कायमस्वरूपी डॉक्टर नर्सेस वार्ड बॉय यांची नेमणूक करून कंत्राटी पद्धत बंद करा, सरासरी २५० रुपये प्रति पेशन्ट खर्च करूनही निकृष्ठ जेवण मिळत आहे या सर्व घटनांची तात्काळ चौकशी करा, शहरातील हातगाडी,पथारी व्यावसायिक तसेच पोळीभाजी सेंटर, इ सेवा व्यवसाय वरील निर्बंध हटवा, घरकामगारा वरील अघोषित निर्बंध टाकलेल्या शहरातील सर्व सोसायटीच्या व्यवस्थापन समित्यांना निर्बंध हटवण्याचे अधिकृत आदेश काढा, शिक्षण शुल्क सक्ती करून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास अकाउंट बंद केलेल्या आणि तसे करणाऱ्या शहरातील सर्व खाजगी शिक्षण संस्थावर कारवाई करा

या निदर्शनात क्रांतीकुमार कडुलकर, गणेश दराडे, अपर्णा दराडे, स्वप्निल जेवळे, सचिन देसाई, कुणाल म्हेत्रे, संजय म्हेत्रे, सुरेश बाबू, रंजीता लाटकर, अविनाश लाटकर, किसान शेवते, संजय ओहोळ, एकनाथ साळवी, संतोष गायकवाड, विनोद चव्हाण, सुषमा इंगोले सह कार्यकर्ते सामील झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा