Breaking

आम आदमी पार्टीचे तुकाराम मुंडेच्या बदली विरोधात तीव्र आंदोलन.

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे ह्यांची बदली तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावी, या मागणीला घेऊन आप आदमी पक्षातर्फे आज संविधान चौक येथे आयुक्त ह्यांच्या समर्थनार्थ, तसेच बदली केल्याच्या संदर्भांत निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले.

आपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेले असून कटकारस्थान रचून त्यांना त्रास देण्यात आल्याचे आपने म्हटले आहे.

नागपुर शहराला एक चांगले कर्तव्यनिष्ठ आय. ए. एस. अधिकारी म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंडे मिळाले होते, यांच्यामुळे नागपुर शहरात स्वच्छतेपासून ते कोरोना नियंत्रण करण्यापर्यंत यांनी यश मिळविले होते. नागपुरला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मुंडे यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची आज नितांत गरज आहे. नागपुरात मनपाचे चांगले रुग्णालय बनाविन्यासाठी, ड्रेनेज सफाई, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, आर्थिक शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आज नागपुरात मुंडे ह्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.

परंतु महापालिकेतील सत्ताधारी बीजेपी आणि कांग्रेस पक्षाने एकत्रित येवून नगरसेवक, आमदार, खासदार हे मुंडे यांच्या बदली करण्यासाठी मागे लागले होते. आम आदमी पार्टीने मुंडे ह्यांची बदली तात्काळ प्रभावाने रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केले आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आंदोलनात आप चे विदर्भ व राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले व नीलेश गोयल, युवा राज्य समिती सदस्य कृतल वेलेकर, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, नागपुर युवा संयोजक गिरीश तीतरमारे, हरीश गुरानी, संजय सिंह, आकाश कावले, राहुल कावडे, विवेक चापले आदीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा