Breaking

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने खामगाव येथे तीव्र आंदोलन, 'या' केल्या मागण्या. वाचा सविस्तर

बुलढाणा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन खामगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
 
आज डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त व मोदी सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, महिला, कामगार, विद्यार्थी, विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुगी, गौरी लंकेश याच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक करा,  उत्पादन खर्च अधिक ५० % हमी भाव द्या. मोदी सरकारने काढलेले शेती व शेती विषयक अध्यादेश तातडीने रद्द करा, शेतकऱ्यांना बँकेमार्फत तातडीने कर्ज पुरवठा करा, स्थलांतरीत मजुरांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून किमान २०० दिवस कामाची हमी द्या, सरकारने खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करुन कसत असलेल्या आदिवासींंना त्याच्या जामिनीचे पट्टे द्या, कोरोना संकट काळात आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला किमान ७५०० स्पये थेट मदत द्या, कोरोना संकट असेपर्यंत प्रत्येक व्यक्ती १५ किलो धान्य १ किलो ते ल १ किलो साखर रेशन दुकानातून मोफत देण्यात यावे, कोरोना काळातील विज बिले माफ करण्यात यावी, शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनामध्ये डॉ. विप्लव कविश्वर, जितेंद्र चोपडे, प्रकाश पताळे, रोझाताई बाठे (कविश्वर), महेश वकतकर, कॉ. सागर पताळे, सुष्टी कविश्वर, अँँड. अविनाश बावसकर, संजय वाघमारे, बंडूभाऊ रावणकार, जिवनगिर गोसावी, हरिदास बगाडे, राम गांवडे, सदाशिव भारसाकडे, गोपलसिंह इंगळे, धनंजय भारसाकडे, योगेश राहाणे, प्रविण कविश्वर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा