Breaking

माकपची जिल्हा कचेरी समोर भरपावसात तीव्र निदर्शने.


नांदेड : लॉकडाऊन काळातील सर्व गरजूंना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा या व इतर मागण्या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर भर पावसात तीव्र निदर्शने करण्यात आली. 

यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबाना सात हजार पाचशे रूपये आर्थिक मदत करून प्रती व्यक्तीस दहा किलो धान्य पुरवठा करण्यात यावा. नांदेड रेल्वे स्टेशन येथील कंत्राटी कामगारांचे पगारामधील लाखो रूपये हडप करणाऱ्या रेल्वे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा. वाहन धारक व मायक्रो फायनान्स धारकांना एजन्ट व वसूली करणारे लोक जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन केंद्राने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या मुख्य सुत्रधारांना अटक करा. नांदेड शहरातील व जिल्ह्यातील काही खाजगी हॉस्पिटल कडून कोरोना रूग्णांची आर्थिक लूट होत असल्या प्रकरणी अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत त्या तक्रारी प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. अनुराधा परसोडे, कॉ. दत्ता इंगळे, रविन्द्र जाधव, जयराज गायकवाड, इस्माईल खान, मीरा बहादूरे, अनुसया गोटमुखे, सिमा गजभारे, रब्बाना बी पठाण, पार्वती सुर्यवंशी आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा