Breaking

मोठी बातमी : राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरु


मुंबई :  कोरोनाच्या महामारीमुळे देशात आणि राज्य लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामध्ये बस सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

एसटीची आंतरजिल्हा बस सेवा 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. यामध्ये साधी, निम आराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी एसटी प्रवासाला ई-पास ची आवश्यकता नसल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा