Breaking

यादव मळा करंजे येथील रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेचे ठिय्या आंदोलन. या आमदाराची घेतली मुंबई येथे भेट.

सांगली : यादव मळा करंजे येथील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज १० दिवस असून किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच मुंबई येथे किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांची भेट घेतली. आमदार निकोले यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

करंजे येथील यादव मळ्यातील शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी होणार्‍या अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या वेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत घोरखाना कॉम्रेड डॉ. आदित्य अहिरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तकुमार खंडागळे, गोपीनाथ सुर्यवंशी, अँड.विजय सुर्यवंशी, भाई भानुदास सूर्यवंशी, वैभव यादव, बापुराव यादव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा