Breaking

जनभूमी साहित्य : कविता : लग्न म्हणजे तरी काय असत - ज्ञानेश्वर जावीर


कविता

लग्न म्हणजे तरी काय असत.

आपलं घर सोडुन परक्या घरी जायचं असतं,
त्या परक्या घराला आपलंस करायसं असतं,
लग्न एक स्वतंञ आयुष्य बंधनात ठेवायचं असतं,
मोकळ्या श्रासाला थोडंस आकडतं ध्यायचं असतं

आवडत नसलं तरी आवडुन घ्यायचं असतं,
कोणालाही न दुखावता सांभाळुन राहायचं असतं,
लहान असलं तरी मोठ्यासारखं वागायचं असतं,
कोणी किती रागावलं तरी रुसायच माञ नसतं,

इतराच्या आवडी प्रमाणं राहायचं असतं,
अन समजत नसलं तरी समजुन घ्यायचं असतं,
आयुष्यच हे कोड हळुहळु सोडवायचं असतं,
वळणाच्या वाटेवर माञ वळुनच जायच असतं,

मोठ्यांच्या अनुभवाने घर चालवायचं असतं,
पटत नसलं तरी पटवुन घ्यायचं असतं,
खोटं खोटं हसुन पुढे जायचं असतं,
नकळत कधीतरी रडुन मन मोकळ करयचं असतं,

इतरांच्या आनंदातच समाधान मानायचं असतं,
सगळ्यांच्या मनात एक घर करायचं असतं,
सर्वांना जीव लाऊन प्रेमानं राहायचं असतं,
आनंदातच दुःखालाही स्वीकारायचं असतं

- ज्ञानेश्वर जावीर
- हिवतड ता. आटपाडी जि. सांगली 
- 9370635519

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा