Breaking

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; सार्वजनिक क्षेत्रातील 'या' मोठ्या चार बँकांचे होणार खासगीकरण


नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या चार बँकांचे खासगीकरण होणार आहे, यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असल्याने बँकांचे खाजगीकरण करून पैसा उभारला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

या मध्ये पंजाब अँँण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या मोठ्या बँकांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या बँकांमध्ये सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. मात्र सरकार आता समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या वर्षाअखेरीस पर्यंत या बँकांचे खासगीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पैसा उभारण्यासाठी आणि सरकारी बँकांची परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील पाचच बँकांमध्ये गूंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून इतर बँकांचे खासगीकरण केले जाणार असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा