Breaking

देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर


देश विदेश
१) लेबनॉनची सत्ता सैन्याच्या ताब्यात, लेबनॉनमध्ये आणीबाणी जाहिर

बैरूत, लेबनॉन: सरकारने राजीनामा दिल्यानंतर लेबनॉनमध्ये आणीबाणी लागू झालेली आहे. सैन्याला कर्फू लागू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तसेच बातम्यांवर ही नियंत्रण करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

२) पाकिस्तान न्यायालयाने हाफिज सैदच्या दोन सहकाऱ्यांची १ वर्षाची शिक्षा माफ केली

इस्लामाबाद, पाकिस्तान: त्यांची नावे अब्दुल रेहमान मक्की आणि अब्दुस सलाम अशी असून ते जमात-उ-दावाह या संघटनेशी संबंधीत आहेत. त्यांच्यावर दहशतवादी विरोधी संस्थेने १ वर्षाच्या अटकेची कारवाई केली होती. 

३) भुटानमध्ये आज पहिल्यांदाच देशभर संचार बंदी लागू करण्यात आली

थिंपू, भूटान: भूटानमध्ये आज लागू झालेली संचार बंदी ५ ते २१ दिवस असणार असल्याचे सरकारकडुन सांगण्यात आले. यातून कोरोनाबाधितांना वेगळे करणे सोपे होणार असून प्रसार थांबायला मदत होणार आहे.

४) अमेरिकेने H-1B, L-1 व्हिसावर लावलेली बंधने काही प्रमाणात शिथिल केली

वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेने घेतलेला निर्णय आयटीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये त्यांना जेथे नोकरी सुरू होती तेथेच करणे बंधनकारक आहे.

५) इस्त्राईलने मिसाईल संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली

जेरूसलेम, इस्त्राईल: याचे नाव ॲरो-२ असून ही प्रणाली कमी आणि मध्यम पल्ल्याच्या मिसाईल विरूद्ध चांगल्याप्रकारे काम करत असल्याचे इस्त्राईल कडून सांगण्यात आले. 

६) CSIR मोठी चाचणी लॅब बनविन्यासाठी प्रयत्न करत आहे

दिल्ली, भारत: CSIR आता मोठी चाचणी यंत्रणा तयार करण्याच्या तयारीत असून त्यामध्ये मोठे यंत्र वापरण्याच्या तयारीत असून त्यातून मोठ्याप्रमाणात चाचणी एकावेळी करण्याची क्षमता असू शकणार आहे.

७) अमेरिकेच्या सैन्याने इराण सैन्याने लिबेरिअन नागरी जहाजवरती सैन्य उतरवून चेकींग केली असा आरोप केला

वॉशिग्टन, अमेरीका: अमेरिकेच्या सैन्याने असा आरोप केला तसेच ते जहाज मोठ्याप्रमाणात कच्चेतेल घेऊन जात होते. त्यावर हेलिकॉप्टर उतरविण्यात आले होते. 

८) स्कोटिश रेल्वेचा डब्बा पलटला, ३ लोक मृत्यूमुखी

स्टोनहेवन, स्कोटलंडच्या: स्कोटिश रेल्वेचा डब्बा पलटला असून त्यामध्ये ३ लोक मृत्यूमुखी झाले असून आलेला पूर आणि दरड कोसळमुळे असे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

९) सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांना दवाखान्यात रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे दाखल करण्यात आले

डामास्कस, सिरिया: ते संसदेत भाषण देत होते. तेव्हा त्यांना आरोग्याची समस्या जाणवायला लागली त्यामुळे त्यांनी ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला असल्याचे समोर आले आहे.

१०) फेसबुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीला पाहून खोटी माहिती पसरवली जाऊ नये म्हणुन टिम नेमली

वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिका येऊ घातलेली निवडणूक आणि त्यावर होणारा फेसबुकचा प्रभाव पाहता निवडणूक खोट्यामाहितीमुळे पुढे जाऊ नये म्हणुन फेसबुक चेकिंग मोठ्याप्रमाणात करणार असून त्याद्वारे खोट्यामाहिती प्रसार थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा