Breaking

२४ ऑगस्ट : शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या टॉप ५ बातम्या.

१. शाळांसाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याची मागणी. 

शाळांकडून भरपूर फीस आकारणी केली जात असल्याची बातमी काही नवीन नाही. शुल्क प्रतिबंध कायदा अस्तित्वात असूनही अधिक शुल्क आकारले जाते आहे. त्यामुळेच प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी अकरावी प्रमाणे पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील प्रवेशही ऑनलाईन पध्दतीने करण्याची मागणी जनहित याचिका द्वारे करण्यात आली आहे. या मागणीवर सहा आठवड्यात योग्य तो निर्णय घ्या, असे आदेश राज्य सरकारला उच्च न्यायालयाने  दिले आहेत. ऍड. राजेश धारप यांनी ही याचिका केली आहे.

२. दहावीच्या गुणांच्या आधारे सैनिक शाळेत प्रवेश.

सैनिकी क्षेत्रात मराठी टक्का वाढवा म्हणून राज्य शासनाच्या वतीने सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या शाळेत इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 'एनडीए' साठी निवड व्हावी म्हणून या शाळेत कसून मेहनत घेतली जाते. पण ६० विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो. त्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्वी लेखी परीक्षा व नंतर मुलाखात घेतली जाते. सोबतच शारीरिक पात्रता ही तपासली जाते. यंदा कोरोनामुळे संस्थेने प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे.
यावेळेस इयत्ता १० वी च्या गुणवत्ता क्रमानुसार ही निवड केली जाणार आहे. प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार नसल्याचे संस्थेचे संचालक कर्नल अमित दळवी यांनी नमूद केले आहे. गुणवत्ता क्रमासाठी गणित, विज्ञान आणि इंंग्रजी या विषयातील गुण ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार असून ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना माहिती भरता येणार आहे. 

३. १० सप्टेंबर पर्यंत युजीसी नेट करीता आवेदन करता येईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी नी सीएसआईआर युजीसी नेट २०२० साठी आवेदन १० सप्टेंबर पर्यंत करता येईल. कोरोनामुळे विद्यार्थी आवेदनाची प्रक्रिया पूर्ण करू शकले नव्हते. 

४. नवीन शिक्षण धोरणावर मागितल्या सुचना. 

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा पूर्वी शाळेतील शिक्षकाना व प्राचार्यांना सूचना मागविल्या आहेत. ३४ वर्षानंतर नवीन शिक्षण धोरण आले आहे, हे धोरण लागू करताना शिक्षक महत्वाची कडी आहेत, असे मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियालनी म्हंटल आहे.

५. ५६९ वायरमनला प्रशिक्षण देण्यात येणार.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये अनुकंपानुसार वायरमन पदाच्या ५६९ जागांच्या भरतीसाठी आयटीआय प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिकने दिली. वायरमनच्या पदाकरिता पात्र असतानाही प्रशिक्षणच्या अभावी नोकरीपासून वंचीत असलेल्या युवकांना राज्यातील आयटीआय प्रशिक्षण देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक वर्षांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अमित हटवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा