Breaking

रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे; 'आप' च्या वतीने उप-विभागीय अभियंतांंना निवेदन.

नागपूर : रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीला घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने उप-विभागीय अभियंता उदय भोयर यांना निवेदन देण्यात आले.

पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र प्रभाग ११ येथील गोधणी ते झिंगाबाई टाकळी रस्त्याचे सिमेंटीकरण व रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागानी खाजगी ठेकेदाराला दिले. या रस्त्याचा बांधकामाचा कालावधी संपूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. रोज या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.

'आप' ने निवेदनात म्हटले आहे की, अपघात क्षेत्रात बॅरिकेट्स ची व्यवस्था करावी, सुरक्षेच्या दृष्टीने उपाय केलेले आहे. विद्युत खांब  रस्त्याच्या बाजूला करावे, नागमोडी वळण याकरीता उपाययोजना करा, आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देते वेळी आम आदमी पार्टी चे संघटन मंत्री शंकर इंगोले, आकाश कावळे, हरीश गुरबानी, जय चौहान, विवेक चापले, आकाश काळे, ललित कटारिया, अमीर अन्सारी इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा