Breaking

... तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू काँग्रेस नेते, मंत्री विजय वडेट्टीवार

नागपूर : कोरोना काळात देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. सध्या कॉंग्रेस पक्षा अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी गेल्या वर्षभरापासून कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद संभाळत होत्या. मात्र, आता मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नवीन अध्यक्ष निवडा असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांच्यानंतर गांधी कुटुंबातीलच कोणीतरी पक्षाचे अध्यक्षपद संभाळावे. त्यांच्याकडे पक्ष आणि देश संभाळण्याची क्षमता आहे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच महाराष्ट्र कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाला आहे. उद्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यावर आम्ही राज्य सरकारमधून बाहेर पडू अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली आहे.


दरम्यान, कॉंग्रेस पक्षात लोकशाही आहे त्यामुळे पक्षात सर्वजण आपलं मत मांडू शकतात. आमच्या इथे भारतीय जनता पार्टीसारखी हुकुमशाही नाही. जे दोन व्यक्ती निर्णय घेतील तेच स्वीकारावे लागतील, असा टोलाही वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा