Breaking

जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेच्या माकपच्या मागणीला यश.


मुंबई : जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागणीला यश आलेले आहे. त्या संबंधित परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी सं. ना. भांडारकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काढले आहे. माकपने मागणीला यश मिळाले असल्याचे डॉ. भाऊसाहेब झिरपे यांनी म्हटले आहे.

माकपने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, राज्य सरकारने १० ऑगस्ट २०२० रोजी ग्रामविकास मार्फत राबवलेल्या बदली टप्पा चार मधे १८९० शिक्षकांची पारदर्शक बदली प्रक्रिया राबवली आहे. या बाबत सरकारचे आभार. राज्य शासनाने जिल्हा परिषदेला बदलीने येणाऱ्या व जाणाऱ्या शिक्षकांंची यादी पाठवली त्यासोबत कार्यमुक्तती आदेशही थेट पाठवले आहेत. त्याची प्रिंट काढून ते सबंधीत शिक्षकांना तात्काळ देणे अपेक्षित आहे. या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचारावर निर्बंध येतात वरकरणी असे दिसते. मात्र वास्तवात हे आदेश जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शिक्षकांना देण्याची पद्धत आहे. येथे या अधिकारी मंडळीकडून मोठ्या प्रमाणावर आडवणूक होत आहे. 

जिल्हा परिषदेकडून कार्यमुक्तीचे आदेशच आले नाहीत असे सांगितले जाते. कोविडच्या जीवघेण्या काळात पंचायत समिती ते जिल्हा परिषदेत सिओंना भेटण्यासाठी शिक्षकांना भाग पाडले जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेने तर ही बदली यादीच तब्बल चार दिवसांनी उपलब्ध करून दिली आणि आता  ठाणे जि.प. मधील लिपिकास कॉरंटाइन केले असल्याने पुढील प्रक्रिया तो आल्यानंतर होईल असे शिक्षण विभाग सांगत होते. 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा चौथा टप्पा दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी ऑनलाईन राबवला गेला. यानुसार राज्यातील १८९० शिक्षकांच्या जिल्हा बदलीच्या यादया ग्रामविकासने सर्व जिल्हा परिषदांना पाठवल्या. परंतु काही जिल्हा परिषदांची शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया अद्याप झाली नाही. यामुळे ठाणे जिल्हातून जाणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्हात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश असताना शिक्षकांकडे पैसे मागितले जात होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भ्रष्टाचारमुक्त बदली प्रकिया राबवून बदली प्रकियेस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माकपने केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा