Breaking

परिक्षासंबंधी आदित्य ठाकरेंनी लिहले पंतप्रधानांना पत्र यासह शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या टॉप पाच बातम्या


1. परिक्षासंबंधी आदित्य ठाकरेंनी लिहले पंतप्रधानांना पत्र 

   राज्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी परिक्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. आपल्या नेतृत्वाखाली देश करोनाविरूद्ध लढा देत आहे. " आपल्या नेतृत्वाखाली देश करोनाविरूद्ध लढा देत आहे. यात नागरिकही मोठ्या प्रामाणिकपणे आपलं योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं देशातील बहुतांश जण घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचं ठरवत आहेत. पण, जगभरात जिथे कुठे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हा विषय केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नाही, त्यांच्या कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. त्याचबरोबर आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावं, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा", अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


2.  अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. ची नोंदणी गेल्या पाच वर्षांपासून बंद

   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. ची नोंदणी गेल्या पाच वर्षांपासून बंद असताना संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत असून प्रवेश शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रवेश शुल्काचे काय केले जाते, असा सवाल विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासून आतापर्यंत पीएच.डी.साठी एकही फेलोशिप दिलेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश शुल्कात वाढ का केली, याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. विद्यापीठाने पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अंकेक्षण केले का, असाही सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधकांची संपूर्ण माहिती वर्षनिहाय जाहीर करावी, नवीन विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत.

3. आरटीई प्रवेशांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

   शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) आर्थिकदृष्ट्या दुरबल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. 17 मार्च ला काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूळ कागतपत्रे, छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत 31 ऑगस्टपूर्वी जाऊन प्रवेश निश्चित करावा. पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास इ-मेल द्वारे किंवा मुख्यध्यपकांशी संपर्क साधून ही प्रवेश निश्चित करावा.

4. पदवीपासून प्रवेशाला सुरुवात

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  संलग्नीत महाविद्यालयामधील ऑनलाईन पदवी प्रवेशासाठी 24 ऑगस्टपर्यंत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यात आले. मंगळवार 25 ऑगस्टपासून 28 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या प्रवेशानंतर महाविद्यालयात थेट प्रवेशास सुरवात करण्यात येईल. यादरम्यान विद्यापीठाची नोंदणी सुरू राहणार आहे.

5. 62 टक्के पालक मुलाना शाळेत पाठवणार नाहीत-सर्व्हे

भारतातील 62% पालक म्हणतात की जर सरकारने 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू केल्या तर ते तिथे मुलांना पाठवणार नाहीत.  दैनिक भास्कर वृत्तपत्रानुसार स्थानिक मंडळांच्या सर्वेक्षणात हा दावा केला गेला आहे.  या सर्वेक्षणात 261 जिल्ह्यांतील 25 हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते.  सर्वेक्षणात, 23 टक्के पालकांनी ते शाळेत पाठवणार असल्याचे सांगितले.  15 टक्के लोकांनी उत्तर दिले नाही. 36 टक्के लोकांनी म्हंटल की ते लोकल किवा मेट्रो ट्रेन मधे यात्रा करणार .51 टक्के लोकांनी  नकार दिला आहे. 77 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की ते पुढील दोन महिने थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये जाणार नाहीत. तर 6% सहमत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा