Breaking

आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या टॉप फाईव्ह बातम्या


1. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आता सर्व विभागांत

         20 सप्टेंबरला होणारी  राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेण्यात येणार आहे. गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.  केवळ मुंबई व पुण्यात ही परीक्षा घेणे शक्य नसल्याचे पटोले म्हणाले.  त्यामुळे ही परीक्षा राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

 2. सप्टेंबरमध्ये 10 वी आणि 12 वी ची पुरवणी (सप्लिमेंट) परीक्षा होणार

          इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. तारीख अध्यापही जाहीर केलेली नाही. गत महिन्यातच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता, त्या निकालात काही विषय असे होते की ज्यासाठी पेपर झाला नव्हता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यायी मूल्यांकन पध्दतीमधून गुण देण्यात आले. अशा पेपरमधील निकाल सुधारण्यासाठी बारावीचे विद्यार्थी सप्टेंबरमध्ये पुन्हा परीक्षा देऊ शकतात. ही पर्यायी परीक्षा सुध्दा सप्टेंबरमध्येही घेण्यात येणार आहे.

 3. राष्ट्रीय प्रवासी (स्थलांतरित) शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा

            अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय  प्रवासी (स्थलांतरित) शिष्यवृत्ती योजनेची वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा केंद्र सरकारने 2020-21 या वर्षापासून 6 लाख रुपयांवरून वाढवून 8 लाख रुपये केली आहे.  तसेच किमान पात्रता गुण 55 टक्के वरून 60 टक्के करण्यात आले आहेत.  देखभाल भत्ता विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती प्राप्त करण्याच्या प्रगतीशी जोडला जातो. विविध पडताळणी प्रक्रिया ही सोपी केल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्चपदस्थ संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

 4. यूजीसीने प्रतिज्ञापत्र दाखल केले

            गुरुवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्वोच्च न्यायालयात अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत दहा पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  त्यात असे म्हटले आहे की यूजीसी ही स्वतंत्र संस्था आहे. राज्य सरकारची नव्हे तर युजीसीची देशभरातील विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे. राज्य सरकारांना परीक्षेवर बंदी घालण्याचा अधिकार नाही. युजीसीने सांगितले की ते सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्या बाजूने आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योग्य आहे. परीक्षेशिवाय पदवीला अजिबात महत्व दिल जाऊ शकत नाही. जर परीक्षा वेळेवर घेतल्या नाहीत तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होईल.


 5. पदवीधर प्रवेश:  रातुम विद्यापीठ

          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण 66 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये एकूण 66 हजार विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि त्यासह त्यांच्या अर्जाची पुष्टी केली आहे.  प्रक्रिया 17 जुलै रोजी सुरू झाली होती. यामधे कला क्षेत्रात 40 हजार जागा, वाणिज्य क्षेत्रात 30 हजार जागा, विज्ञान विभागात 35 हजार, गृहविज्ञानात 400 जागा आहेत आणि गृह अर्थशास्त्रात 500 जागा आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा