Breaking

रक्ताचा तुटवडा असतांना नेमक्या क्षणी रक्तदान करणारे योध्दे, हिच खरी राष्ट्रवंदना! वाचा सविस्तर.

कोल्हापूर : कामगार, गुणवंत कामगार, बांधकाम कामगार व एच. आर. अधिकारी यांनी रक्ताचा तुटवडा असताना  रक्तदान केले.

कोल्हापूरमधील शासकीय रूग्णालय येथे रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदाते, रक्तदान हवे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मंडळाला जोडलेल्या नागरिकांना संपर्क केला व रक्तदानासाठी आवाहन केले. रक्तसाठा कमी असतांना, रक्त उपबल्ध करुन देणे ही खरी जबाबदारी असल्याचे कामगार कल्याण मंडळाने 

स्वातंत्र्यदिनाचा समारंभ व रक्तदान गरज असल्याने  रक्तदान शिबीर घेण्यात आले. कामगार कल्याण केंद्र, बिंदुचौक यानी या शिबिराचे नियोजन केले. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, कोसळणारा पाऊस आणि कोरोनाची परिस्थितीमध्ये २० बॅग रक्त CPR रक्तपेढीस देण्यात आल्या.
कोल्हापुरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वतः रक्तदान करत सुरुवात केली. यानंतर राहुल शिंदे, शरद आजगेकर, बाबासाहेब ढेरे, उमेश सुर्यवंशी, धिरज कठारे, कुंडलिक एकशिंगे, अरविंद गवळी, सुहास कुंभार, ऋषिकेश पाटील, मयुर पवार, अतिशय पवार, अनिल माने, लक्ष्मण सावरे, प्रसाद बुधले, विनायक क्षीरसागर-, अनिल शेलार, निलेश कसबे, प्रविण जाधव, नियाज अत्तार यांनी रक्तदान केले. 

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, जिल्हा एड्स निर्मूलन व प्रतिबंध पथक, समुपदेशक कपिल मुळे, दिपक सावंत उपस्थित होते.

रक्तपेढीचे डाॅ. केदारनाथ पाटील, सुनिलकुमार मोरे, रुबिना शरीफमस्सक्कत, आदींसह कर्मचारी सहभागी झाले. तसेच कामगार कल्याण केंद्र चे केंद्रसंचालक संघसेन शांताप्रल्हाद, सचिन शिंगाडे, शाहिन चौगले, विजय खराडे, सुजाता बुधले, श्वेतल सुतार यांनी शिबीर आयोजित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा