Breaking

नाशिक जिल्ह्यात रात्रभर सर्वत्र जोरदार पाऊस.

 


नाशिक प्रतिनिधी: काल रात्रभर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक छोटीमोठी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

नाशिकसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस बरसला. यात नाशिक शहरात सहा मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर सर्वाधिक पावसाची इगतपुरी तालुक्यात झाली आहे.

इगतपुरी येथे ६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर त्र्यंबक २७, पेठ ३६, सुरगाणा १२ अशी नोंद झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसाने जिल्ह्यात १७३ मिलिमीटर ची नोंद झाली आहे.

           दरम्यान (दि.२९) सकाळी १० वाजता गंगापूर धरणातून ०१ हजार cusecs पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे। तर महत्त्वाचे म्हणजे आज रोजी पुढील तीन तासांत तासात नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा