Breaking

अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना आमदार विनोद निकोले यांच्या कडून मदत.

डहाणू : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोर गरीब आदिवासांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर नुकसानग्रस्तांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मदत केली आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून न येण्यासारखे आहे. मध्यंतरी पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भागात मुसळधार अतिवृष्टीमुळे येथील आदिवासी बंधांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही सायवन, निंबापूर, बापूगाव, गंगोडी, कासपाडा या गावांना भेट दिली होती त्यात अनेकांचे घराचे छप्पर उडून गेले आहे, काहींचे पत्रे उडून गेले आहे तर काहीजण पूर्णतः बेघर झाले आहे. तसेच महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन मध्ये बेरोजगार झालेले आदिवासी बांधव शेती करून कसबस आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होते पण, नैसर्गिक आपत्ती मुळे त्यातही नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात मध्यंतरीच्या दिवसांमध्ये पावसाने जोर धरला होता त्यामुळे अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली होती. यामुळे आदिवासी, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढलेल्या पिकांना नवीन पालवी फुटत कोंब देखील आले आहेत. याच पिकांची पाहणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली होती. 
त्यामुळे मध्यंतरी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळात जितके नुकसान झाले होते त्याच बरोबरीचे नुकसान पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भागात मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी तात्काळ ५० कोटी रुपयाचे आर्थिक मदत करावी अशी आमची आहे तर, बांधवांनो तुम्ही हताश व निराश होऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी यावेळी नुकसानग्रस्तांना देत जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट व चादरीचे वाटप केले.

यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखाना, डीवायएफआय मुंबई कमिटी चे बच्चू वाघात, हर्षद लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा