Breaking

जुन्नरच्या पश्चिम भागातील शिवली - कलदरे रस्त्याच्या दुरावस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.

जुन्नर : जुन्नरच्या पश्चिम भागातील शिवली - कलदरे रस्त्याच्या दुरावस्था झालेली असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

मागील काही वर्षांपासून संबंधीत रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे ग्रामस्थांना प्रवास व शेतमाल वाहतुक करण्यास समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

लोकप्रतिनिधींंनी लक्ष देण्याची गरज असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे.
गणपत घोडे, सचिव
भारताचा लोकशाहीवादी युवामहासंघ (DYFI) 


निर्गुडे पाडळी गण / गटातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून रस्त्यांच्या दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी बहुल भागातील रस्त्यांंची दुर्दशा काही नवीन मुद्दा नाही. रस्ते होतात, परंतु वर्षे न होतात. पावसाळ्यात पुन्हा रस्ते उखडलेले असतात. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा