Breaking

शेतमजूर युनियनसह विविध संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्यांंचे निवेदन


प्रतिनिधी : कामगार शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. आज विविध मागण्यांना घेऊन  महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा), अखिल भारतीय किसान सभा, भारतीय ट्रेंड युनियन (सिटू) च्या वतीने सर्वत्र देशव्यापी हाकेतून आंदोलन करुन ज्वलंत जीवनावश्यक मागण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलींद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे. 

सोनवद त.बो. गावांतील चक्रीवादळातील नुकसान झालेल्या कुटूंबाना ताबडतोब नुकसान भरपाईची  मदत करा, कोविड - १९ टेस्ट ची मोफत व्यवस्था करा,रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करा, गरजूंना मोफत रेशन द्या, रोजगार व उत्पन्न बुडालेल्या दरमहा बारा हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या, मनरेगा मार्फत सर्वांना काम द्या, किमान वेतन सहाशे रुपये प्रतिदिन करा, बेरोजगारांना दहा हजार रुपये दरमहा बेरोजगार भत्ता द्या, शेतकरी विरोधी चारही अद्यादेश मागे घ्या, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करा,फिक्स्ड टर्म रोजगार बाबतचा निर्णय रद्द करा, वेतन कपात- कामगार कापतीवर बंदी घाला, सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण / विक्री रद्द करा, नवे शैक्षणिक धोरण मागे घ्या, वीज बिल दुरुस्ती 2020 मागे घ्या, लोकडाऊन काळातील विजबिल माफ करा, यंत्रमाग, ऊसतोड, हॉकर्स, रिक्षाचालक- वाहन चालक यांचेसह असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना कल्याणकारी योजना लागू करा, आदी मागण्या केल्या आहेत.

यावेळी कॉ. सुनील गायकवाड, कॉ.उत्तम पवार, राजाराम ठाकरे, संतोष गायकवाड, सुधीर ठाकरे, रुपाबाई कुवर, शोभाबाई गायकवाड, सुनीता महिरे, श्रीराम महिरे, किशोर पाचूरणे, दीपक मोहिते, सिद्धार्थ गायकवाड, नइम सैय्यद, शहीद शे अजगर, रेहान शे शहीद, जावेद मण्यार इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा