Breaking

७ सप्टेंबर ला किसान सभेच्या वतीने सुरगाणा तहसील वर धडक मोर्चा


 
नाशिक प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा कमिटीच्या वतीने सुरगाणा तहसील ७ सप्टेंबर रोजी कळवण सुरगाणा विधानसभेचे मा. आमदार जे पी गावित यांचा नेतृत्वखाली धकड मोर्चा होणार आहे. हा मोर्चा पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत घ्यावी म्हणून किसान सभेने आंदोलनाचे आयोजन केले  आहे. त्याचबरोबर अजून दुसऱ्या मागण्या सुद्धा आहेत.
किसान सभेच्या मागण्या: 
 ▪️वनअधिकार कायद्या नुसार पात्र दाव्यांना संपूर्ण वन जमीन मंजूर करून ७/१२ ला लावण्यात यावी.तसेच अपात्र दावेदारना २ पुराव्या असतील तर मंजूर करा.
▪️आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू करा.विध्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे उपाय करा.
▪️तालुक्यातील दुष्काळ जाहीर करा. अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या. 
▪️प्रत्यक्ष गरजू कुटूंबाला घरकुल योजना मिळावी म्हणून "ड"यादीत समाविष्ट करा.

    या वरील सर्व मागण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी सुरगाणा तहसील वरती आंदोलन होणार आहे. त्यामुळे सुनील मालुसरे,इंद्रजित गावित, नामदेव मोहनकर, इरफान शेख,सुभाष चौधरी,मनीषा महाले यांनी आंदोलनास उपस्थित राहण्यास  सांगितले आहे. त्याचरोबर त्यांनी सर्वोनी आंदोलनाला येतात मास्क घालून येण्यास सांगितले आहे. आणि आंदोलन दरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याचे आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा