Breaking

झुअरी सिमेंट सोलापूर यांच्या वतीने गरीब व विधवा स्त्रियांना घरपयोगी वस्तूचे किट वाटप
ता - सांगोला
नाझरा :झुअरी सिमेंट सोलापूर यांच्या एक बॅग एक रुपया या उपक्रमा  मधून गरीब कुटुंबाना व विधवा स्त्रियांना घरपयोगी वस्तूंचे १०० किट वाटप करण्यात आले . नाझरा , बलवडी व उदनवाडी या गावांमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी नाझरे गावचे सरपंच हणमंत सरगर यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले व कोविड 19 च्या महामारी मध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले तसेच झुअरी सिमेंट सोलापूर यांचे आभार मानले .
      झुअरी सिमेंटच्या उपस्थित पदाधिकारी यांनी ही आशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबविले  जातील असे आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले.
      यावेळी नाझरे गावचे सरपंच हणमंत सरगर , झुअरी सिमेंट चे पदाधिकारी अंबादास पासगंडे , हर्षल थरटे , विनय खटे , नाझरे गावचे उद्योजक सचिन पवार, ग्रामसेवक लोहार भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी  व इतर नागरिक उपस्थित होते.
       लाभार्थी नागरिकांनी झुअरी सिमेंट व पदाधिकारी यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा