Breaking

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनास मोठे यश नित्रुडसह परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी.
नित्रुड(प्रतिनिधि) माजलगाव तालुक्यातील नित्रुडसह परिसरातील फिडवर बऱ्याच दिवसांपासून विद्युत पुरवठा सुरळीत नाही तसेच गावातील सिंगल फेज डी. पी बाजार डी. पी.व इतर सिंगल फेज डी. पी वरील असणारे 25 25 चे ट्रांसफार्मर बसून तात्काळ विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र निर्दर्शने आंदोलन करण्यात येईल असा  अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता, तेलगाव. यांच्या कडे निवेदना द्वारे केली होती


नित्रुडगावातील सर्व सिंगल फेज डी. पी.वरील जळालेले ट्रांसफार्म तात्काळ बसवावेत,बाजार डी. पी वरील शेतकऱ्यांच्या शेतातील विधुत पंप चालू करा,व एक त्या डी. पी वर नविन ट्रांसफार्म बसवा, गावातील सर्व डी. पी, वरील फ्यूज,लग्ज,केबल,ऑइल,इतर दुरुस्ती करा,इत्यादी मागणी निवेदन MSEB चे अभियंता श्री.चव्हान साहेब यांनी उपस्थित राहुण आंदोलन करण्या पूर्वीच चर्चा करून जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या व कामाला सुरवात केली  आहे.या प्रसंगी माकपचे नेते कॉ.दत्ता डाके,कॉ.संदिपान तेलगड,नारायण तातोडे,रामभाऊ पवार,रामभाऊ राऊत,सुभाष डाके,जनक तेलगड,पांडुरंग ऊबाळे,अँड.अशोक डाके,सुखदेव घुले यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा