Breaking


...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी

नवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी  तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोकरीवरून काढणे शक्य होणार आहे. तसेच कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार आहे. 

केंद्र सरकारने नवीन शेतकी सुधारणा आणल्यानंतर सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता नव्या पुन्हा कामगार कायद्यातील तीन प्रमुख विधेयकांना आता मंजूर दिली आहे.
आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजी मताने औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षेशी संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली. 

पंतप्रधान मोदींनी कामगार कायद्यातील सुधारणेमुळे कामकाजाच्या चांगल्या वातावरणाला हातभार लागेल, ज्यामुळे आर्थिक विकासाची गती वेगवान होईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.  

कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी म्हटले आहे कि, या सुधारणांमुळे आमच्या मेहनती कामगारांचे कल्याण होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. यामुळे कामगारांच्या हितांचे रक्षण होईल. तसेच रोजगारनिर्मितीसाठी कर्मचारी मर्यादा १०० ठेवणे उचित नाही. ही मर्यादा वाढविण्यात आल्याने रोजगारनिर्मिती होईल आणि नोकरभरतीला चालना मिळेल. 

1 टिप्पणी:

  1. सर जो पर्यंत रिश्वत खोर लोक आहे तो पर्यन्त प्राइवेट नोकरि करणाऱ्या लोकांचे काहीच होऊ शकतं नाही

    उत्तर द्याहटवा