Breaking
सिडको कार्यालयावर विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड


नवी मुबंई : सिडको प्रकल्प कार्यालयावर विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करत असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत ताब्यात घेतले. 


अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी आज विमानतळाला घेराव घालण्यासाठी जमले होते. सिडकोने विमानतळासाठी जमीन घेतल्या, परंतु दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे :

१. जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुर्ण घर बांधून होत नाही, तोपर्यंत बाजार भाव प्रमाणे घर भाडे मिळालेच पाहिजे. 
२. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छिमार व्यवसायिकांना २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. 
३. शुन्य पात्रता व अपात्र पध्दत बंद करुन सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज व इतर लाभ मिळालेच पाहिजेत.
४. अ, ब, क, ड घरांचे स्वतंत्र भूखंड , घरभाडे , निर्वाह भत्ता व कृषी मजूरीचे स्वतंत्र कुटूंब म्हणून वाटप झालेच पाहिजे.
५. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित १८ वर्षावरील सर्व युवक युवतीना प्रकल्पग्रस्ताचा दाखला, योग्य ते प्रशिक्षण व रोजगार मिळालाच पाहिजे.
६. खाजगी मंदिराचे भूखंड व बांधकाम खर्च भू - धारकांनाच मिळाले पाहिजे.
७. प्रकल्पग्रस्तांना वाढीव बांधकाम खर्च रुपये २५०० मिळालेच पाहिजे. 
८. कोल्ही - कोपर टाटा पावर, ड्रेनेजस्कीमच्या जमिनी, ट्रस्टीच्या जमिनीचे १२.५ टक्के / २२.५ टक्के पुनर्वसन पॅकेज शेतकऱ्यांनाच मिळावे. 
९. महिला मंडळे व महिला बचत गट यांच्या बांधकामांना पुनर्वसन पॅकेज लागू करा. 
१०. चिंचपाडा तलावपाळीला तिप्पट पुनर्वसन पॅकेज मिळालेच पाहिजे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा