Breaking

ऊसतोड कामगारांचा संप चिघळला, छत्रपती साखर कारखान्यासमोर सीटूचे आंदोलन


उद्या बैठकीत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन - मोहन जाधव


माजलगाव : सध्या राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा संप न्याय मागण्या घेऊन सुरू आहे. संपातील मागण्या ऊसतोड कामगारांचा तोडणी दर चारशे रुपये करा, मुकादमाचे कमिशन, वाहतुकीच्या दरात वाढ, पाच वर्षाचा करार तीन वर्षाचा करावा, विमा मिळाला पाहिजे, ऊसतोड कामगारांचे महामंडळ कार्यान्वित झाले पाहिजे. यासह अनेक मागण्या संपात करण्यात आलेल्या आहेत. संपावर तोडगा काढा नाही तर कारखान्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सीटू ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

संघटनेचे मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव येथे आज जोरदार आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्या शिवाय कारखाने सुरू करू नये, आता संप शेवटच्या टप्प्यात आला असून साखर संघाच्या चार बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही, परंतु २७ तारखेला पुणे येथे साखर संघाने खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघ, शासन व ऊसतोड कामगार संघटनांची बैठक बोलावली आहे. तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनात महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे मोहन जाधव, विनायक चव्हाण, आबा राठोड, विजय राठोड, संजय चव्हाण, बळीराम भुंबे, रुपेश चव्हाण, भिमराव जाधव, भारत राठोड, अविनाश राठोड, मेंडके आदीसह सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा