Breaking


कॉ. प्रकाश जंगम यांचे अल्प आजाराने निधन

 

सातारा : सातारा शहराजवळील समर्थनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. प्रकाश बाबुराव जंगम वय ७२ यांचे अल्प आजाराने आज निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई , मुलगा सुन असा परिवार  आहे.


प्रकाश उर्फ भाऊ हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव जंगम यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अबकारी विभागातील अधिकारी शिरीष जंगम यांचे बंधू होत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते असणारे प्रकाश जंगम यांचा 'सिटू' कामगार संघटना, गिरणी कामगार संघटनेशी संबंध होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा साताऱ्यातील कामगार संघटना, परिवर्तनवादी संघटनांच्या आणि समर्थनगर परिसरातील विविध सामाजिक उपक्रमात ते सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा