Breaking


आदिवासी सम्राट महात्मा 'राजा रावण' यांचा खरा इतिहास समाजात पोहचवा - सुनिताताई गेंगजे


मुंबई : आदिवासी सम्राट महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास समाजात पोहचवा व तो इतिहास  प्रत्येक माणसाला सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बिरसा क्रांती दलाच्या मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुनिताताई गेंगजे यांनी केले.


दसरा सणानिमित्ताने महात्मा राजा रावण यांच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यावेळी सुनिताताई  गेंगजे म्हणाल्या की, आदिवासी समाजात राजा रावण हा खुप महान समजले जाते व राजा रावण यांचे महत्व हे तरूण पिढीला समजू लागले आहे. यामुळे अनेकांनी शहरातून व गावोगावी घराघरात राजा रावणाचे पुजन करूण स्मरण केले व विनम्र अभिवादन केले.
    
रावण हा आदिवासी गोंड जमातील असून तो अतिशय हुशार ताकदवान राजा होता. पण ही ताकद कुठे तरी कमी करण्याच्या हेतुने राजा रावण यांना उच्च वर्णीय लोकांनी षडयंत्र करून समाजामध्ये चुकीची माहिती आजपर्यंत पसरवली आहे. पण आता खरा इतिहास हा आदिवासी समाजापुढे येत आहे. 

आदिवासी संरक्षक, आदिवासी संस्कृती रक्षक, मातृसत्ताक कुटूंब पध्दतीचा पुरस्कर्ता, चरीञसंपन्न, न्यायप्रिय राजा, अतिशय शूर व महापराक्रमी, बलाढ्य, मातेला सर्वश्रेष्ठ पूजनीय मानणारा, महान यौध्द, चारी वेदांमध्ये पारंगत, सर्व रागाचा बादशाह, त्यांच्या रागामध्ये एवढी ताकद होती की एखादा राग आवळत असताना पावसाचा वर्षाव व्हायचा असा उल्लेख सापडतो. पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये यांच्या आहारी न जाता त्यांना आपल्या मनाच्या आधीन ठेऊन त्यांच्यावर विजय मिळविणारे राजा रावण होते.

राजा रावण यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन दसरा या दिवशी करू नये. ही प्रथा कायमस्वरूपी बंद व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा